Testimonials...

 

सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी धनंजय महाडिक यांनी गेली १५-२0 वर्षे घेतलेले अथक परिश्रम निश्‍चितच प्रशंसनीय आहेत. लोकोपयोगी कार्य किती विविध पातळ्यावंर उत्तमरीत्या राबवता येते, याचा सुंदर नमुना धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सादर केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक अभीष्टचिंतन.

- ना. हर्षवर्धन पाटील


पद नसताना दूरदृष्टी ठेवून भरीव काम करणारा तरुण कार्यकर्ता म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ती धनंजय महाडिक यांनी. वेगवेगळे सामाजिक उपक्रम, कार्यक्रम युवाशक्तीच्या माध्यमातून राबवून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली आहे. ते अपल्याला मिळणार्‍या पदाचा उपयोग नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी करतील, यात शंका नाही.

- अरुण डोंगळे


स्वर्गीय भीमरावदादा महाडिक यांनी लावलेलया रोपट्याचा वटवृक्ष करण्याचे काम त्यांचा पुत्र धनंजय महाडिक करत आहे. उद्योग, शिक्षण, कला क्रीडा, कृषी अशा सर्वच क्षेत्रात धनंजयने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. विशेषत: तरुणवर्गासाठी युवाशक्तीच्या माध्यमातून धनंजयने केलेली कामगिरी वेगळा इतिहास निर्माण करणारी ठरली आहे. 

- मा. मंत्री रामराजे निंबाळकर


 

एक कुशल संघटक, एक उत्तम व्यवस्थापक, प्रशासक आणि समाजहिताचा कळवळा असणारा राजकारणी अशी धनंजय महाडिक यांची ओळख आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न उगमता मोठय़ा हिमतीने चिकाटीने आणि निर्धाराने ते परिस्थितीशी दोन हात करतात आणि विजय खेचून आणतात. सर्वसामान्यांशी थेट संपर्क हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 

- आ. भारत भालके


 

धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्ह्यांत उल्लेखनीय असे कार्य करत आहेत. युवाशक्तीचे काम, खेळासाठी भरीव योगदान, समाजातील सर्वच घटकांसाठी त्यांचे सुरू असलेले कार्य निश्‍चितच दखलपात्र आहे. त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा.

- ना. प्रतीक पाटील


स्वर्गीय भीमराव महाडिक यांची कर्तृत्वाची परंपरा पुढे चालवत धनंजय महाडिक यांनी कुस्ती, कृषी शिक्षण, क्रीडा, कला क्षेत्रात अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटवलाय. धनंजय महाडिक यांचे सर्वच घटकांसाठी असलेले कार्य प्रत्येकाच्या नजरेत भरणारे आहे. महाडिक यांना वाढदिनी शुभकामना.

- ना. आर. आर. पाटील


 

कोल्हापूर जिल्ह्यातील युवाशक्तीला संघटित करून त्याला विधायकतेची जोड देत विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, प्रबोधनात्मक उपक्रमांतून युवकांच्यात चैतन्य निर्माण करण्याचा प्रय▪धनंजय नेहमी करत आहे. भूतकाळाची जाण, वर्तमानाचे भान व भविष्याची दृष्टी त्याला लाभलेली आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून परिवर्तनाचा व विकासाचा वसा घेतलेला आहे. विविध उद्योगांच्या सहाय्याने युवकांच्या हाताला काम देण्याचे कार्य तो करत आहे. पदापेक्षाही कार्यावर निष्ठा ठेवून त्याचा प्रवास सुरू आहे. त्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामुळेच भविष्यातील वाटचाल सुकर होणार आहे. 

उत्तम संघटन कौशल्य, योग्य निर्णयक्षमता, सकारात्मक दृष्टी, विचारांची प्रगल्भता, धैर्य हे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. युवकांच्या हृदयाला हात घालण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे. कोणत्याही कामातील अचूकता, नियमितपणा, सातत्य वेळोवेळी दिसतो. सामान्यांचे नेतृत्व गुणामुळेच त्याची तरुणाईतील व विविध संस्थांमधील लोकप्रियता अजूनही टिकून आहे. शब्दाला जागणे हा आमचा संस्कार तो नेहमीच जतन करतो. त्याच्या या कर्तृत्वाच्या जोरावरच भविष्यातील यशाची, प्रवासाची आम्हास खात्री आहे. या वाटचालीत मी त्याच्या मागे हिमालयासारखा उभा आहे.

- आ. महादेवराव महाडिक


 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा पराभव झाला; मात्र ते खचले नाहीत. दुसर्‍या दिवसापासून कामाला लागले. राजकारणात असे उदाहरण पाहायला मिळणे कठीणच आहे. कोणतीही सत्ता नसताना सामाजिक बांधिलकीचे नाते धनंजय महाडिक यांनी अतिशय घट्ट केले आहे. आपली फौज घेऊन ते कामाला लागतात. अनेक साधने असतानाही भल्या भल्या राजकीय मंडळींना जे जमले नाही, ते महाडिक यांनी केले आहे. कामामधली त्यांचे सातत्य वाखाणण्यासारखे आहे. वंचितांना मदत करणे आणि कोणत्याही उपकाराची भाषा न ठेवणे वा त्यांच्याकडे परतफेडीची अपेक्षा न ठेवणे हे त्यांनाच जमले आहे. यावेळी लोकसभेला ते जोरदार मुसंडी मारतील, यात शंका नाही. आता लोकांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांचे सामाजिक कामाचे माप लोक त्यांच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाहीत, याची आपल्याला खात्री आहे. युवकांची एक फळीच त्यांच्यापाठीशी भरभक्कमपणे उभी आहे. त्यामुळे यंदा गुलाल निश्‍चित..

- हसन मुश्रीफ, कामगारमंत्री